Thursday, 18 April 2013

वृक्ष स्तब्ध असला तरी निष्क्रिय असत नाही. त्याच्याकडून शिकण्यासारख खूप आहे..पण मला शिकायचं आहे तो त्याच्यातला निस्वार्थ भाव.. आणि एवढंच पुरेस आहे आयुष्याचा परिस व्हायला...

अपूर ज्ञान हे काजव्याच्या प्रकाश इतकच छोट असत... आणि मी हि तितकाच छोटा आहे..मला काय हव ते ओळखायला..

job करतोय हा प्रोब्लेम नाही.. पण तो का करायचा हे समजून न घेण हा प्रॉब्लेम आहे..माझ्या एका मित्राची व्यथा आणि थोडी बहोत माझीही व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतोय..अजूनही आयुष्यात करण्यासारख खूप आहे पण वेळ नाही आणि अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या नेहमीच कोड्यात टाकत असतात... आणि मग नंतर आपणच स्वताची समजूत घालतो.. असुदे सगळीकडे हे असच चालत...